दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेकडून १०० ट्रक दिवाळीचा शिधा रवाना!
📍 मुंबई | २० ऑक्टोबर २०२६
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत असताना काँग्रेससोबत सरकार स्थापन करणे हीच खरी ‘व्होट चोरी’ असल्याचा आरोप त्यांनी केला.

# शिंदेंच्या भाषणातील ठळक मुद्दे
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना मैदानात
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत शिवसेनेकडून १०० ट्रक दिवाळीचा शिधा रवाना करण्यात आला. गरज पडल्यास आणखी शेकडो ट्रक मदत पाठवण्यात येईल, असे शिंदे म्हणाले.
जिथे संकट, तिथे शिवसेना
शेतकऱ्यांच्या संकटात राजकारण न करता त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केले.
विरोधकांवर जोरदार टीका
व्होट चोरी, मतदार याद्या आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवरून काँग्रेस व उबाठावर निशाणा साधत विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा हात
शेतकऱ्यांच्या पत्नींना २५ हजार शिलाई मशीन आणि शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विवाह ठरलेल्या शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठीही मदत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मोदी सरकारचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करताना शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. तरुणांना भडकवण्याऐवजी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
एकनाथ शिंदे यांचा ठाम संदेश:
“शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा आहे. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे.”
शिवसेनेचा निर्धार — शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, संकटात प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणार\!