
विद्रोही कविता, व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज आणि दलित पँथर चळवळीचा धगधगता इतिहास… ज्येष्ठ कवी आणि विचारवंत पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर आधारित ‘ढसाळ’ या बहुप्रतीक्षित चरित्रपटाचा टीझर नागपूर येथे आयोजित धम्मा फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
या टीझरमध्ये अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत प्रभावी अंदाजात दिसत असून, त्याचा दमदार लूक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
# चित्रपटाची खास वैशिष्ट्ये
लेखन व दिग्दर्शन – वरुणा मदनलाल राणा आणि संजय पांडे संगीत – ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा गीतलेखन – इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर गायक – आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे रंगभूषा – श्रीकांत देसाई छायांकन – मिलिंद जोग
नामदेव ढसाळ यांच्या बंडखोर विचारांचा, सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याचा आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाचा वेध घेणारा हा चित्रपट नव्या पिढीला त्यांच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.
नामदेव ढसाळ यांच्या संघर्षाची धग आणि विद्रोही विचारांची ताकद मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.